Sunday, July 9, 2017

द्रोहबाण ...अजूनही कपटी द्रोणाचार्य फिरत असतात जागोजागी
ओठांवरती तेच फसवं स्मित अन काळजात विखार घेऊनि
खान्द्यावरती हात टाकतात, संस्कृतीचा नटवा शब्दच्छल करतात.
गरळ मेंदूतले रित्या हातात ओतत जातात.
भेदाभेद करत विद्रोहाचाच लक्ष्यभेद करतात.
वेश बदलूनी, मुखवटा लावूनी फिरतात.
पोटात शूळ अभद्र, हातात तुळ विषम
घेउनी ते न्याय हवा तसा करतात फिरत...
मी भिल्लपुत्र नव्या युगाचा
प्रत्यंचेवर चढवून द्रोहबाण
घेईन वेध नवद्रोणांच्या मुखाचा...

- समीर गायकवाड.